नाशिक: ॲड. राहुल ढिकले यांचा विजय निश्चित- ज्येष्ठ माजी नगरसेवक आढाव

नाशिक (प्रतिनिधी): ११ पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेलरोड भागातील नागरिकांना आश्वासक व ओळखीचा चेहरा हवा आहे. गेल्या पाच वर्षांपासून आमदार असताना सातत्याने संपर्कात राहणाऱ्या महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या रूपाने हा चेहरा स्थानिक नागरिकांना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा विजय तर निश्चित आहेच, शिवाय त्यांना अधिक मताधिक्य मिळेल असा दावा ज्येष्ठ माजी नगरसेवक दिनकर आढाव यांनी व्यक्त केला.

पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ जेलरोड भागातील प्रभाग क्रमांक १८ मधील दसक, पंचक गाव, प्रगती नगर, स्वामी समर्थ केंद्र, सायट्रिक सदगुरु नगर, ढिकले नगर, फिलिप्स सोसायटी, बिल्वजा सोसायटी, शिवाजी नगर या भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांकडून ज्येष्ठ नगरसेवक आढाव यांनी विश्वास दिला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

ते म्हणाले, सन २००९ मध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली. यात पंचवटी नाशिक रोड व जेलरोड या महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला. पहिल्याच निवडणुकीत नागरिकांनी भेटले. कुटुंबातील कै. उत्तमराव ढिकले यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाले. त्यानंतर या मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले.

सन २०१४ व त्यानंतर सन २०१९ या दोन विधानसभेच्या टर्म मध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना विकास काय आहे हे समजले. या मतदारसंघांमध्ये रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. मळे भागातील रस्ते व पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नवीन नगरांची निर्मिती होत असताना तेथे पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम आमदार ढिकले यांनी केले. फक्त कामेच नाही तर मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आमदार या नात्याने ढिकले राहिले.

हे ही वाचा:  नाशिक: पाऱ्यात घसरण, थंडीचा जोर वाढला; नाशिकचे किमान तापमान 12.4 तर, निफाड 10.9 अंश सेल्सियस

त्यामुळे २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसानंतर देखील पुढच्या पाच वर्षासाठी आम्हाला ओळखीचा जाणकार व आश्वासक चेहरा म्हणून आमदार ॲड. राहुल ढिकले यांनाच पुन्हा निवडून द्यावे लागेल. ‘अभी नही तो कभी नही’ आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचा विकास साध्य करायचा असेल, तर ढिकले यांचेच नेतृत्व आपल्याला लागेल असे मत माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी व्यक्त केले.

माजी नगरसेविका मीराताई हांडगे यांनी जनसामान्याच्या मदतीला तात्काळ धावून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून ॲड ढिकले यांचा उल्लेख केला. शरद मोरे यांनी प्रत्येकाला घरचा माणूस वाटावा असा जनसंपर्क ठेवल्याने ढिकले हेच विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मंगेश मोरे, सचिन हांडगे, राहुल बेरड, आप्पा नाठे, संदीप पाटील, प्रविण पवार, सचिन सिसोदे, दिनेश नाचण, सुरेखा निमसे, कुंदा सहाने, राहुल गायकवाड, शंतनु निसाळ, कृष्णा बोराडे, अमोल बोराडे, आदित्य ढिकले, सुयश पागेरे, स्वप्निल कातोरे, विजय भिशे, मतेश जडगुले, सागर लखन, योगेश रसाळ, कपिल खर्जुल, यतिश ठाकूर, महेश पवार, सुमित चव्हाणके, सागर कड, राहुल कोथमिरे, योगेश कपिले, दिनेश अहिरे, दिलीप आढाव, शुभम पाटील, गणेश गडाख, वैभव देशमाने, सुनिल धोंगडे, अविनाश यादव, सागर कड, दीपक आढाव, प्रशांत कळमकर, शैलेंद्र सिंग, पंकज टिळे, विनायक काळे, अजिंक्य माळवे, अजिंक्य ढिकले, केतन बोराडे, बाळा कदम, कृष्णा क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790