नाशिक (प्रतिनिधी): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७१ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुणवंत जिवण वाणी (रा.हनुमाननगर,मालेगावरोड नांदगाव जि.नाशिक) असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे. वाणी गुरूवारी (दि.७) सकाळच्या सुमारास अशोकनगर येथून शिवाजीनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. बसस्टॉप जवळील महादेव मंदिराम्समोर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने वाणी गंभीर जखमी झाले होते.
त्यांचे भाऊ दिलीप वाणी यांनी त्यांना तात्काळ सुयश हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. समिर भिरूड यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: ११४/२०२४)
![]()


