नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी परिसरात चॉपर घेऊन दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट १ ला यश आलं आहे.
रविवारी म्हणजेच दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार रवींद्र आढाव यांना माहिती मिळाली की पंचवटीच्या हमालवाडी पाटाजवळ एक इसम हातात धारदार चॉपर घेवुन रस्त्याने आरडाओरडा शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत आहे.
ही माहिती रविंद्र आढाव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंखे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, राजेश लोखंडे, अंमलदार नितीन जगताप, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ अशांनी इसमास हमालवाडी पाटाजवळ, पंचवटी नाशिक येथुन सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.
या इसमाचे नाव सचिन दशरथ आमटे (वय २५ वर्ष, रा. घर नं.३, हमाल हौसिंग सोसायटी, हमालवाडी पेठरोड नाशिक) असे असुन त्याच्याकडून १००० रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार सुरा हस्तगत करण्यात आला आहे.
सदर इसमाविरूध्द पंचवटी पोलीस ठाणे येथे सरकारतर्फ फिर्यादी होवुन, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


