नाशिक: ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर कुणी जबरदस्तीने बसलं तर करा फक्त एक मेसेज, तत्काळ मिळेल मदत !

नाशिक (प्रतिनिधी): आपण नेहमी ट्रेनमध्ये प्रवास करतो. पण कधीतरी असा प्रसंग येतो की आपल्या हक्काच्या सीटवर भलतंच कुणीतरी बसलेलं असतं. अशावेळी आपण त्या व्यक्तीला उठायला सांगतो. उठला तर ठीक नाहीतर मग भांडणाचं मूळ होऊन जातं. हे सगळं टाळण्यासाठी रेल्वेने एक भन्नाट उपाय केला आहे.

भारतामध्ये दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी आहे. रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि सुक्षित समजला जातो. कमी अंतराचा प्रवास असो की जास्त अंतराचा, भारतीयांना रेल्वेचा प्रवास परवडणारा असतो. ट्रेनमध्ये आरक्षित डब्यांसह जनरल डबेही असतात. जनरल डब्यामध्ये कोणताही प्रवाशी कुठेही बसू शकतो. त्यासाठी कोणताही वेगळा नियम नाही. परंतु आरक्षित डब्यांमध्ये बसण्यासाठी बुकिंग करावं लागतं आणि जे सीट मिळालं आहे त्यावरुनच प्रवास करावा लागतो.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

परंतु अनेकदा सीटवरुन भांडणं होताना दिसून येतात. काही प्रवाशी जबरदस्तीने आरक्षित सीटवर बसतात. जर असा प्रकार कुणासोबत घडला तर भांडत बसायची गरज नाही. तुम्ही एका सोप्या पद्धतीने त्या व्यक्तीला सीटवरुन उठवू शकता. जो व्यक्ती जबरदस्तीने आरक्षित सीटवर बसला असेल त्याची तक्रार टीसीकडे करता येते.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

दुसरा सोपा उपाय म्हणजे 139 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करता येतो किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट Rail Madad वर तक्रार करता येते.

139 नंबरवर मेसेज कसा करायचा ? : आपण आपला पीएनआर नंबर टाकून आपल्या सीटची माहिती मेसेजवरुन जाणून घेऊ शकता. त्यानंतर टीसीदेखील तिथे येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. त्यासाठी खालील मेथडचा वापर करावा. SEAT (PNR NUMBER) (SEAT NUMBER) OCCUPIED BY UNKOWN PASSENGER असा मेसेज १३९ नंबरवर करावा.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

उदाहरणार्थ, SEAT 23456781 S2-27 OCCUPIED BY UNKOWN PASSENGER असा मेसेज केल्यास तुम्हाला तुमच्या सीटचे डिटेल्स मिळतील आणि तक्रारी केल्याने टीसी तिथे येऊन तुम्हाला तुमचं सीट देईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790