नाशिक (प्रतिनिधी): दिवाळी आणि छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आणखी मुंबई ते छपरादरम्यान सहा आणि पनवेल ते नांदेडदरम्यान दोन अशा आठ उत्सव विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५११४ एलटीटी मुंबई-छपरा उत्सव विशेष गाडी एलटीटी येथून ४, ११ आणि १८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.१५ वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता छपरा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०५११३ छपरा-एलटीटी उत्सव विशेष छपरा येथून ३, १० आणि १७ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वासहा वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७६३६ पनवेल-नांदेड उत्सव विशेष गाडी पनवेल येथून ७ नोव्हेंबरला सायंकाळी साडेचार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक ०७६३५ नांदेड-पनवेल उत्सव विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून ६ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पनवेलला पोहोचेल.