नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील मेनरोड, शालीमार परिसरात मोठी गर्दी होत आहे. या गर्दीच्या नियोजनसाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिटी लिंकच्या वतीने मंगळवारपासून (दि. २९) सिटी लिंकच्या मार्गात बदल केला आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत हा बदल राहणार असून सिटी लिंकची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. प्रवाशांनी पर्याची बस मार्गांची नोंद घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागासह सिटी लिंकच्या वतीने करण्यात आली आहे.
👉 सिटी लिंकसाठी या मार्गावर प्रवेश बंद:
दिंडोरी नाका (निमाणी) येथून सीबीएसकडे येणाऱ्या व जाणाऱ्या शहर वाहतूक सेवेच्या सिटी लिंक बसेसना पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, शालिमार या मार्गावर वाहतुकीस प्रवेश बंद केला आहे.
👉 सिटी लिंक बसकरीता पर्यायी मार्ग:
दिंडोरी नाका (निमाणी) येथून सीबीएसकडे जाणाऱ्या सिटी लिंक बसेस या दिंडोरीनाका, पेठ फाटा, मखमलाबादनाका, बायजाबाई छावणी, रामवाडी, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नलमार्गे इतरत्र जातील. तसेच सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या सिटी लिंक बसेस या अशोकस्तंभ, जुना गंगापूरनाका, चोपडा लॉन्समार्गे जातील.