नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन असल्यापासून सज्ञान होईपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अल्पवयीन पीडिता मुलगी ही सातपूर परिसरात राहते. संशयित आरोपी राहुल रवींद्र खरात (वय २५, रा. अशोकनगर, सातपूर) याने फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलगी ही सज्ञान होईपर्यंत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. हा प्रकार मार्च २०१६ ते मे २०२४ यादरम्यान सुरू होता; मात्र पीडित मुलीने आरोपी राहुल खरात याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली; मात्र आरोपी तरुणाने तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली व पीडितेला मारून टाकण्याची धमकी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

एवढेच नव्हे, तर पीडितेला मारहाण करून तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडित मुलीने सातपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी राहुल खरातविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७४/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790