नाशिक: एकाच दुकानात दोनदा लूट करणारे ताब्यात; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील प्रगती टेक्सटाइल या घाऊक कपडे विक्रीच्या दुकानात दोनवेळा चोरी करत रोख रक्कम, मोबाइल लांबवणारा सराईत गुन्हेगार संशयित गणेश ऊर्फ अजय आसाराम कोळी, नवनाथ भानुदास कोकाटे यांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ सप्टेंबर व १३ ऑक्टोबर या दोन तारखांना धुळे येथील सराईत कोळी व कोकाटे यांनी चोरी केली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून केला जात होता. हवालदार महेश साळुंके, राहुल पालखेडे यांनी या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केले. आप्पा पानवळ यांना गोपनीय बातमीदाराकडून दोघे सराईत गुन्हेगार गोल्फ क्लब येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबत कळवले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार मुख्तार शेख, नितीन जगताप, राम बर्डे, समाधान पवार, मनीषा सरोदे आदींचे पथक संशयितांच्या मागावर रवाना केले. पथकाने गोल्फ क्लब मैदानाजवळ सापळा रचला. याठिकाणी दोघे सराईत गुन्हेगार येताच पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. या दोघांना सातपूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790