नाशिक (प्रतिनिधी): जैन समाजातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी ‘जितो’तर्फे मुंबई नाका परिसरातील बिझनेस बे येथे शनिवारपासून (दि.१९) दोन दिवस आठव्या हाट बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात ९० स्टॉलवर कपडे, खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तूंसह विविध उत्पादने असतील. चिंतामणी पार्श्वनाथ संघाचे विश्वस्त महेश शाह, एनबीएसच्या विश्वस्त निर्मला शाह, मांगीतुंगी देवस्थानचे अध्यक्ष सुमेरकुमार काले, गजपंथ दिगंबर जैन सिद्धक्षेत्राच्या अध्यक्षा सुवर्णा काले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790