नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी असलेल्या रिक्षाला पाठीमागून भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत रिक्षातील तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना पंचवटीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मिनाली सुदर्शन राठोड (रा. आडगाव शिवार, नाशिक) व त्यांचे वडील पूनमचंद उखा चव्हाण असे रविवार कारंजा येथून म्हसरूळकडे जाण्यासाठी एमएच १५ एफयू १२९७ या क्रमांकाच्या रिक्षाने प्रवास करीत होते. ही रिक्षा दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटलसमोर आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १९ सीवाय ८६३४ या क्रमांकाच्या पिकअप वाहनावरील चालकाने रिक्षाला धडक दिली. त्यात प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी असलेली रिक्षा पलटी झाली.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

त्यात फिर्यादी राठोड, त्यांचे वडील पूनमचंद चव्हाण व इतर दोन महिला प्रवाशांना दुखापत झाली असून, वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पिक अपचालक व रिक्षा चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५८६/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790