नाशिक: विघ्नेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कोजागिरी निमित्त आज (दि. १६) ‘स्वर चांदणं’ संगीत मैफल

नाशिक (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संगीत प्रेमींसाठी आज (दि. 16 ऑक्टोबर 2024) विघ्नेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त “स्वर चांदणं” या सांगीतिक मैफलचे संध्याकाळी ६.३० वाजता विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे.

बाबाज थिएटर्स प्रस्तुत या कार्यक्रमात ‘इंडियन आयडॉल’ फेम ऋषिकेश शेलार यांचे गायन तसेच त्या सोबत युवासिंगर चेतन लोखंडे, मयूर तुकडिया, रसिका नातू, श्रेयसी रॉय हे गायक अमोल पालेकर यांच्या वाद्य वृंदासह आपली कला सादर करतील.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जुन्नर यांची असून स्नेहा रत्नपारखी या निवेदन करणार आहेत. मराठी, हिंदी, सुफी संगीत प्रकार कार्यक्रमात सादर होणार असून संगीत प्रेमी रसिकांनी उपस्थित राहून कोजागिरीचा आनंद घ्यावा असे आवाहन विघ्नेश्वर ट्रस्ट चे विश्वस्त आणि सचिव सौ. योगिता पाटील यांनी केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण: विघ्नेश्वर मंदिर उद्यान. डॉक्टर वडगावकर हॉस्पिटल जवळ. जुना गंगापूर नाका, नाशिक.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790