
नाशिक: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थानच्या वतीनने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पहाटे सहा वाजता साक्षी गणेश मंदिरापासून प्रेरणा मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरुवात झाली.

भगव्या झेंड्याच्या नेतृत्वात, शस्त्र पथक, भगवे फेटे, पांढरी टोपी आणि पारंपरिक वेशभूषेत एक हजार तरुण, तरुणी, महिलांसह लहान मुलांच्या सहभागातून ही दौड मेनरोड, रेडक्रोस सिग्नल, म. गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गे काळाराम मंदिराच्या पूर्व महाद्वारावर दौडीची सांगता करण्यात आली.
शहरांत ठिकठिकाणी ध्वजाचे औक्षण करण्यात आले तसेच रांगोळ्या काढून दौडिचे स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले, नगरसेवक उल्हास धनवटे, मयूर नाटकर, प्रवीण भाटे आदि मान्यवर उपस्थित होते.
![]()


