नाशिक: क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशनची लिंक पाठवत खाते हॅक, १९.४७ लाखांचा अपहार

नाशिक (प्रतिनिधी): क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशनची लिंक पाठवत बँक खाते हॅक करून ग्राहकाच्या बँक खात्यातून १९ लाख ४७ हजारांची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी रक्कम वर्ग झालेल्या बँकेशी मेलद्वारे संपर्क साधून ग्राहकाची पाच लाखांची रक्कम होल्ड करत परत मिळवून दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

पोलिसांनी दिलेली माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाइलवर अनोळखी नंबरहून कॉल आला. समोरील व्यक्तीने पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हिजनमधून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशन अपडेट करण्याचा बहाणा करत लिंक पाठवली. या लिंकद्वारे बँकेचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी लिंक ओपन करत सर्व माहिती भरताच हॅकर्सने फोनचा ॲक्सेस घेत ऑनलाइन बैंकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून परस्पर २३ लाख ६५ हजार आणि ८२ हजार अशी २४ लाख ४७ हजारांची रक्कम विविध बँक खात्यांत वर्ग केली. तक्रारदाराने सायबर पोलिसांत तक्रार केली. पथकाने तत्काळ ज्या बँकेत पैसे वर्ग झाले त्या बँकेशी संपर्क साधून पुढील व्यवहार थांबवण्यास सांगितले. ग्राहकाचे ५ लाख थांबवण्यात आल्याने ५ लाखांची रक्कम परत मिळाली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790