नाशिक शहराच्या ‘या’ भागांतील वाहतूक मार्गात आजपासून (दि. ३) महत्वाचे बदल…

नाशिक (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (दि. ३ ऑक्टोबर २०२४) प्रारंभ होत आहे. शहराची ग्रामदेवता कालिका देवी यात्रोत्सव तर, भगूर येथे रेणुका देवी यात्रोत्सव असल्याने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

हे बदल दसऱ्यापर्यंत (ता.१२) कायम राहतील. बदल संदर्भात व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याची अधिसूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून मनपा-महावितरणमध्ये दावे-प्रतिदावे

कालिका देवी बॅरकेडिंग पॉइंट:
त्र्यंबक नाका सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका टॅक्सी स्टँड, चांडक सर्कल, महापालिका आयुक्त बंगला, शिंगाडा तलाव, संदीप हॉटेल.

प्रवेश बंद: गडकरी सिग्नल ते मुंबई नाका टॅक्सी स्टँड- चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपर्यंत.
पर्यायी मार्ग: तिडके कॉलनीतून नंदिनी नदी पुलावरून गोविंदनगर मार्गे इंदिरानगर, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉलकडे मार्गस्थ, चांडक सर्कल, सीबीएस, शालीमार, सारडा सर्कलकडे मार्गस्थ. द्वारकाकडून येणारी वाहने सारडा सर्कल, शालीमारमार्गे येतील-जातील. प्रवासी वाहने, सिटी लिंक बसेस त्र्यंबक नाका सिग्नलवरुन गंजमाळ, सारडा सर्कलमार्गे नाशिकरोडकडे मार्गस्थ. हलकी वाहने मुंबई नाक्यावरून टॅक्सी स्टँडमार्गे तुपसाखरे लॉन्स, चांडक सर्कल, त्र्यंबक रोडमार्गे मार्गस्थ. द्वारका सिग्नलकडून पंचवटीत जाणारी अवजड वाहने कन्नमवारपूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी हायस्कूलमार्गे मार्गस्थ. सारडा सर्कल, गडकरी चौकात येणारी वाहने एन. डी. पटेल रोड मार्गे जि.प. रस्त्यावरून मार्गस्थ

हे ही वाचा:  नाशिक: बंद बंगला, व रो हाऊसचे लॉक तोडून घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज लंपास

रेणुका देवी, भगूर प्रवेश बंद:
रेस्ट कॅम्परोड हा चिंतामणी चौफुली ते नाका क्रमांक दोनपर्यंत.
पर्यायी मार्ग: भगूर गावातून देवळाली कॅम्पकडे येणारी जाणारी वाहने रेस्ट कॅम्प रस्त्यावरील जोशी रुग्णालय-स्नेहनगर-पेरुमल मार्ग-टेम्पल हिल रोड-जोझिला मार्ग-रेस्ट कॅम्प रस्त्यावरील सेंट्रल स्कूलमार्गे मार्गस्थ.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790