नाशिक: भामरे मिसळ ते रणभूमी रस्ता विकासाला सव्वा कोटी मंजूर !

नाशिक (प्रतिनिधी): कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ हा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिका महासभेने सोमवारी मान्यता दिली. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या सतत अडीच वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिका प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील बडदेनगर ते पाटीलनगरला जोडणारा कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रिकेट मैदान ते खोडे मळ्यातील भामरे मिसळ रस्ता विकसित करावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिल्यानंतर यासाठी महापालिका अर्थसंकल्पात सव्वा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी द्यावी, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर सोमवारी, २३ सप्टेंबर २०२४ च्या महासभेत या कामाचे एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपयांचे प्राकलन मंजूर करण्यात आले. कर्मयोगीनगर येथील परमानंद अ‍ॅकॅडमीजवळ बॉक्स कल्व्हर्ट अर्थात छोटा पूल व संरक्षक भिंत बांधून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

यामुळे गोविंदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नवे, जुने सिडको, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खांडे मळा, तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी आदी भागातील रहिवाशांची सोय होणार आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790