नाशिक: घरातून रोख रक्कम चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या रविवारी घरातील मंडळी गणपती आरतीसाठी घराचा दरवाजा लोटुन अर्पाटमेंटच्या खाली गेले असता, अज्ञात आरोपीतांने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून, बेडरूममध्ये ठेवलेले रोख ४२ हजार रुपये चोरी करून नेल्याची घटना पंचवटीत घडली होती.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

फिर्यादी सौ. आशा भाउसाहेब गोसावी, रा. हिरावाडी, पंचवटी, नाशिक ह्यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस स्टेशन येथे ५२८/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०५ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अर्पाटमेंट मधील सीसीटीव्ही फुटेज चेक करून, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताची माहिती मिळवली. सदरचा गुन्हा हा याच परिसरात राहणारा पवन नरेश दरोडे (वय २५ वर्षे, रा. राज रेसिडेन्सि, शक्तीनगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) याने केला असल्याचे निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन, त्याच्या कडुन गुन्हयात चोरीस गेलेले एकुण ४० हजार रूपये मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष घुगे हे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790