दुर्दैवी घटना: नाशिक: विसर्जनाला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर व परिसरात गणेश विसर्जन उत्साहात पार पडत असतानाच पाथर्डी परिसरातील नांदूर रस्ता वालदेवी नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विसर्जन करीत असताना दुर्दैवी अंत झाल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी, पिंपळगाव खांब व दाडेगाव परिसरात काल सकाळपासूनच गणेश विसर्जनाची वालदेवी नदीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उत्साहाच्या वातावरणात गणेश विसर्जन सुरू होते (दि १८) रोजी मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान गणेश विसर्जनासाठी म्हाडा कॉलनी येथे राहणारे ओंकार चंद्रकांत गाडे (२३) स्वयंम भैया मोरे (२४) हे गणेश विसर्जनासाठी गेले होते. गणेश विसर्जनसाठी ते नदी पात्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्या ठिकाणी उभे असलेल्यांनी आरडाओरडा करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. काहींनी नदीत उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता ते दिसेनासे झाले. त्यांच्या मित्रांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला परंतु ते मिळून न आल्याने याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दलाला ही माहिती कळवताच परिसरात जवळच असलेल्या अग्निशमन दलाने वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. तसेच इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे माजी नगरसेवक भगवान दोंदे, युवा जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, पाथर्डी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते हे देखील हजर झाले.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

त्यांनीही सहकार्य करीत शोध घेण्यास मदत केली. एक तासाच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मयत ओमकार हा केटीएचएम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. तर स्वयंम मोरे संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या दोन्ही तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे म्हाडा कॉलनी व पाथर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790