नाशिक (प्रतिनिधी): गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मंगळवारी (दि. १७) सायंकाळी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
मिरवणुकीला वाकडी बारव – येथून प्रारंभ होणार आहे. दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, दुधबाजार चौक, गाडगेमहाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोडने मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट लेन, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरिया रोडने कपालेश्वर मंदिर, म्हसोबा पटांगण, येथे समारोप होणार आहे.
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहतूक आणि सिटी लिंक बस सकाळी १० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत पंचवटी डेपो २ निमाणी बस स्थानक, तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सर्व बसेस पंचवटी डेपो येथून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, पुढे द्वारका सर्कल, नाशिकरोड, शहरात व इतरत्र जातील.