नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गाव शिवारात जन्मदात्या आईच्या नावावर असलेल्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून त्यावर खोट्या सह्या करीत स्वत:च्या नावावर करून घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी लक्ष्मण हरिभाऊ गांगुर्डे (रा. सामनगाव रोड, सिन्नर फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मुलगी अर्चना संजीवन खराडे (४०), संजीवन प्रकाश खराडे (५२), विश्वेश संजीवन खराडे (१८, सर्व रा. उत्कर्ष पॅलेस, त्रिमूर्ती चौक, सिडको), संजय तुळशीराम गाडेकर (रा. गाडेकर मळा, सिन्नर फाटा) यांनी संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील देवळाली गाव शिवारातील प्लॉट गांगुर्डे यांच्या पत्नीच्या नावे आहे. मात्र त्यांची मुलगी संशयित अर्चना खराडे यांच्यासह संशयितांनी संगनमत करून या मिळकतीचे बनावट दस्तऐवज करून त्यावर खोट्या सह्या केल्या आणि त्याद्वारे ही मिळकत अर्चना खराडे यांच्या नावावर करून गांगुर्डे यांची फसवणूक केली.
दरम्यान गांगुर्डे यांची बहीण रेखा हरिभाऊ गांगुर्डे यांना संशयितांनी शिवीगाळ, मारहाण करीत जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. याप्रकरणी २०२१ मध्ये गांगुर्डे यांनी न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने याप्रकरणी संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असता, त्यानुसार नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४२३/२०२४)