नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवदर्शनाकरिता गेलेल्या महिलेच्या घरातून चोरी केलेला दागिन्याचा डब्बा गॅरेजच्या बाहेर मिळून आला. गॅरेज मालकाने प्रामाणिकपणे १४.५ तोळे सोने व २७ भार चांदी दागिने असलेला डब्बा पंचवटी पोलिसांना सुपूर्द करत समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. पोलिसांनी गॅरेज मालकाचा सत्कार केला.
कमलाबाई पमवानी (रा. महालक्ष्मी टॉकीज मागे), या तिरुपती बालाजी येथे दर्शनाकरिता गेल्या असताना त्यांच्या घराची खिडकी उघडून सोन्याचे दागिने ठेवलेला डब्बा चोरी करण्यात आदर्श होता. चोराने डब्बा चोरला मात्र हा डब्बा एका गॅरेज समोर फेकून दिला.
गॅरेजमालक तुषार आढाव यांना हा डब्बा मिळून आला. त्यांनी डब्बा उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे दागिने, रोकड, एलआयसीची पावती होती. त्यांनी पोलिस अंमलदार अमित शिंदे यांना कळवले. शिंदे यांनी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली. पथकाने डब्बा ताब्यात घेत पंचनामा करत १४.५ तोळे सोने २७ भार चांदी, असा १९ लाख १८ हजारांचा मुद्देमाल होता.
पावतीवरील नावाच्या आधारे महिलेचा शोध घेतला हा डब्बा कमलाबाई पमवानी यांचा होता. त्यांचा शोध घेत संपर्क साधला. त्या देवदर्शनाला असल्याचे समजले. रविवारी (दि. ४) त्या परत आल्या. आढाव यांच्या हस्ते पमवानी यांना दागिन्याचाच डब्बा परत केला.