समुपदेशन सुरू असतानाच संशयित पत्नीकडून शिवीगाळ
नाशिक (प्रतिनिधी): महिला सुरक्षा शाखेत समुपदेशनाकरता आलेल्या महिलेने पतीच्या डोक्यात दगड मारत सासू-सासऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शरणपूररोड येथील महिला सुरक्षा विभाग कार्यालयाच्या आवारात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि स्वप्नील कुन्डे (रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक येथे पत्नीने पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या तारखेसाठी आलो असता दुपारी ३ वाजता समुपदेशन सुरू असताना संशयित पत्नी शिवीगाळ करत बाहेर आली. कार्यालयाच्या आवारात पडलेले दगड उचलून डोक्यात व कपाळावर मारून गंभीर दुखापत केली. संशयित पत्नीच्या आई-वडिलांनी मारहाण करत दुखापत केली.
समुपदेशन कक्षाच्या कर्मचारी महिलांनी बाद वेळीच मिटवत पोलिसांना कळवले. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.