नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रविवार कारंजावरील अत्यंत धोकेदायक अवस्थेतील महापालिकेची यशवंत मंडई ही इमारत तत्काळ खाली करा अशी अंतिम नोटीस कस्संकलन विभागाने गाळेधारकांना दिली होती. यानंतर, आता मंगळवारी पालिकेने या गाळेधारकांचे वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने गाळेधारकांनी मंगळवारी (दि. ११) आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी नवीन इमारत बांधल्यावर आम्हाला तेथे जागा द्यावी, अशी अटीवर गाळे खाली करण्याची तयारी दर्शवली आहे.
दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने त्रयस्थ संस्थेकडून यशवंत मंडईचे ऑडिट केले. त्यात ही इमारत धोकेदायक असल्याचे निष्पन्न झाले व महापालिका करसंकलन विभागाने येथील २४ व्यावसायिकांना तातडीने गाळी खाली करा, अशा सूचना दिल्या. मात्र, त्या विरोधात व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने मापा व व्यावसायिक दोघांनाही ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले.
या दोन्ही अहवालांत ही इमारत धोकादायक असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत येथील व्यावसायिकांना गाळे खाली करण्यास सांगितले. मात्र, तरीदेखील सहकार्य केले जात नसल्याने येथील व्यावसायिकांना ३१ मेपर्यंत गाळे खाली करण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा महापालिका गाळेधारकांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा दिला होता. ही इमारत पाडून येथे पार्किंगसाठी प्रस्ताव आहे.