नाशिक: आंतरराज्यीय टोळीकडून २२ मोबाइल हस्तगत; गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गुन्हेशाखा युनिट क्र.१ च्या पथकाने सापळा रचत आंध्रप्रदेश व तामिळनाडूतील टोळीकडून २ लाख ३८ हजार रूपये किमतीचे चोरीचे २२ मोबाइल हस्तगत केले. पंचवटीतील फ्लॅटमधून एकाचवेळी पाच मोबाइल चोरीस गेले होते. पोलिस या घटनेची उकल करीत असताना पुढच्या काही तासातच मोबाइल चोरणारी मोठी टोळीच पोलिसांच्या हाती लागली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

शहरात मोबाइल चोरीचे वाढते प्रमाण पाहता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरट्यांच्या शोध घेण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले. बुधवारी (दि.५) सकाळी सात वाजेच्या सुमारास राजपाल कॉलनी, पंचवटी येथील तेजश्री अपार्टमेंटमधील एकाच फ्लॅटमधून पाच मोबाइल फोन चोरी झाले होते. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हेशाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथील मोबाइल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी शहरात आली असल्याची माहिती मिळाली. नंतर चोरट्यांनी आपला मुक्काम देवळाली गाव परिसरात हलविला.

टोळीतील तीनजण नाशिकरोड येथील वाघ चौकात चोरलेले मोबाइल विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा रचून इंद्रा डुमप्पा, रा. १-२३ बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि. चित्तूर (आंध्रप्रदेश), बालाजी सुब्रमणी, रा. ५०२. उदया राजपालम थोटागल जि. त्रिपथूर (तामिळनाडू). दुर्गेश कृष्णमूर्ती रा. बोडीगुटला पाले, व्यंकटगिरी कोटा, (आंध्रप्रदेश) यांना ताब्यात घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790