नाशिक: भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय पादचारी ठार

नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडी भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय पादचारी ठार झाला. रहिसोद्दीन निजामुद्दीन काजी (रा. क्रांतीनगर, उंटवाडीरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

रहिसोद्दीन काजी बुधवारी (दि.२९) रात्री जेवण आटोपून पायमोकळे करण्यासाठी संभाजी चौकाच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. घरापासून काही अंतरावरच पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने मुलगा रिझवान काझी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

याबाबत पोलीस नाईक शेवरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790