नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर शहरातील ८५० खासगी होर्डिंग्जची तपासणी झाली असून त्यामध्ये फारशी अनियमितता आढळली नसल्याचा महापालिकेच्या विविध कर विभागाचा दावा आहे.
मात्र सरकारी जागेतील नऊ होर्डिंग्ज धोकेदायक असल्यामुळे तातडीने काढण्याच्या सूचना दिल्या असून त्याची बीएसएनएलकडून तातडीने अंमलबजावणी झाली आहे. मुंबईतील घाटकोपर भागात
होर्डिंगपडून १८ जणांचा मृत्यू व ६९ जखमी झाले. त्यामुळे नाशिक महापालिकाहद्दीतील ८५० होर्डिंगची तपासणी करण्यात आली. शहरातील होर्डिंग हे तुलनेमध्ये खासगी जागेवरील बहुतांश जाहीरात होर्डिंग्ज नियमात असल्याचा विविध कर विभागाचा दावा आहे.
सीबीआएस व मुंबई नाका येथील राज्य परिवहन महामंडळाच्या जागेतील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान बीएसएनएलच्या हद्दीतील जाहिरात होर्डिंग्ज धोकादायक असल्याने तातडीने उतरविण्यात आले.