नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष करत दुचाकी हून पाठीमागून येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन ती साच्याद्वारे वितळवून लगड विकणाऱ्या दोन अल्पवयीनांना म्हसरुळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ६४ हजारांची सोन्याची लगड जप्त केली. ४ गुन्हे उघडकीस आले आहे. मिळालेल्या पैशांतून स्पोर्ट बाईक, महागडे मोबाईल आणि मौज मजा केल्याची कबूली संशयितांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माहिती मिळाल्यानुसार दोन संशयित सोन्याची लगड विक्री करण्याकरता येणार आहे. पथकाने दिंडोरी रोड परिसरात त्यांना ताब्यात घेतले. दोघांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून चौकशीत मखमलाबादला ४ सोनसाखळ्या चोरल्याचे त्यांनी सांगितले.
सोने वितळवण्याचा साचा जप्त:
संशयित दोघे लुटलेली सोनसाखळी वितळवून त्याची लगड बनवत ती विक्री करत होते. दोघांनी सोने वितळवण्याचा साचा विकत घेतला होता. सोने विक्री करून मिळालेल्या पैशांत स्पोर्ट बाईक, महागडे मोबाईल आणि मौज मजा करत होते. संशयितांकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाची चौकशी सुरु आहे.