नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक मधील अपोलो हॉस्पिटल येथे 125 वे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले, पण यावेळी विशेष म्हणजे रुग्णाचा रक्तगट आणि अवयव दान करणाऱ्या त्याच्या पत्नीचा रक्तगट हा वेगवेगळा होता, अत्यंत जोखमीच्या अशा या किडनी प्रत्यारोपण शत्रक्रयेत अपोलो हॉस्पिटल नाशिकच्या टीमला यश आले.
यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल यांनी सांगितले की “रुग्णाचा रक्तगट हा B होता आणि रुग्णाच्या बायकोचा रक्तगट हा A होता तसंच त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही रक्तगट जुळत नसल्याने त्यांचे सहा महिन्यांपासून डायलिसिस सुरू होते. सदर रुग्णाचे अवयव दानाच्या प्रतीक्षा यादीत नाव नोंदवून देखील नंबर लागत नसल्याने आणि रुग्णाची तब्येत वेळो वेळी खालावत असल्याने त्याला डायलिसिस वर खूप दिवस ठेवणे देखील कठीण होते. यावर पर्याय म्हणून मी त्यांना वेगळा रक्तगट असला तरीही अँटीबोडीज ची लेवल तपासून किडनी प्रत्यारोपण करणे शक्य असल्यास ते सांगितले.
रुग्ण व त्याच्या पत्नीचे सर्व शंकांचे निरासन करून रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या, रक्तगट जरी वेगळा असला तरी नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शरीरातल्या वेगळ्या रक्तगट असलेल्या अँटीबोडीज विट्रोसॉफ्ट नावाच्या फिल्टरने काढण्यात आल्या अँटीबोडीजची लेव्हल काही विशिष्ट औषधांनी कंट्रोल करून किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. हि टेक्निक शिकण्यासाठी मी कलकत्ता येथे एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो त्यावेळी मला जपान येथील प्रसिद्ध डॉ. तानाबे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या शस्त्रक्रियेकरिता नागपूरचे प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मनीष बलवानी यांचे मार्गदर्शन लाभले कारण वेगळ्या रक्तगटा च्या किडनी प्रत्यारोपणात प्लाझ्मा फोर्सेस ही पद्धत वापरून किडणी प्रत्यारोपण करता येते पण त्यात शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण हे विशेष फिल्टर वापरून अँटीबोडीज ची लेवल जुळवून किडनी ट्रान्सप्लांट केले जे बहुतेक उत्तर महाराष्ट्रात प्रथमच असेल आणि ते यशस्वी झाले याचा मला आनंद होतो”.
अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित जा म्हणाले की “अपोलो हॉस्पिटल नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे नाशिक बरोबरच जळगाव, धुळे, नंदुरबार, शिरपूर, शहादा, संगमनेर येथील अनेक रुग्णांवर अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडले आहे यामुळे या भागातील रुग्णांना मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही तसेच मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च देखील कमी असून रुग्णाची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची शस्त्रक्रियेनंतर राहण्याची किंवा रुग्णाला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यासाठी होणारी गैरसोय टाळता येते. अपोलो हॉस्पिटल मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ ,अनुभवी डॉक्टर्स ,किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेले कुशल सर्जन आणि इतर सपोर्ट स्टाफ यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.
या सगळ्यांच्या सहकाऱ्यामुळे आणि रुग्णांचा अपोलो हॉस्पिटल नाशिक वरती असलेल्या विश्वासामुळे आज 125 किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा पार केल्याचा मला अभिमान आहे, या 125 किडनी पर्वतारोपणातील अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि त्या रुग्णांना आम्ही NGO , काही सामाजिक संस्था तसेच क्राउड फंडिंग च्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील मिळवून दिले आहे. आमच्या किडनी प्रत्यारोपण टीम मधील हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभयसिंग वालिया, युरो सर्जन डॉ.अमोलकुमार पाटील,डॉ.प्रवीण गोवर्धने, भूलतज्ञ डॉ.चेतन भंडारे, डॉ. भूपेश पराते,डॉ.अमिता टिपरे, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण ताजणे, डॉ.अमोल खोल्मकर, डॉ.अतुल सांगळे, डॉ.बालाजी वड्डी तसेच अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ. चारुशीला जाधव यांचे मी खूप आभार मानतो”.