नाशिक: बँक खात्याची माहिती घेत वृद्धेला ५० हजारांचा गंडा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथे प्राप्त पार्सल व पैसे परत करण्यासाठी वृद्धेकडून बँक खाते क्रमांक घेत ओटीपीद्वारे यांच्या खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढून घेत वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बीएसएनएल केबल चोरी प्रकरणात मोठा पर्दाफाश; मुंबईतून २.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त, ६ अटकेत

मंजू राजन गांधी (६७, रा. आनंदवन अपार्टमेंट, पाथर्डी फाटा) या २७ मार्चला सकाळी साडेदहाच्या सुमारास घरी होत्या. त्यावेळी संशयिताने गांधी यांना प्राप्त पार्सल व पैसे परत करण्यासाठी त्यांचा बँक खाते क्रमांक घेतला. त्यानंतर ओटीपी क्रमांकाद्वारे गांधी यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन काढून फसवणूक केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790