नाशिक: शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनतर्फे रविवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

नाशिक (प्रतिनिधी): प्रतीवर्षीप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने कर्मयोगीनगर, तिडकेनगर येथील औदुंबर वाटिका उद्यानात रविवारी, ३ मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने सन २००९ पासून मोठ्या भक्तीभावाने श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो. तिडकेनगर, कर्मयोगीनगर, गोविंदनगर, कालिका पार्क, सुंदरबन कॉलनी, कृष्णबन कॉलनी, सद्गुरूनगर, खोडे मळा, खांडे मळा, पांगरे मळा, बडदेनगर, जुने सिडको, जगतापनगर, पाटीलनगर, हेडगेवारनगर, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, बाजीरावनगर, सदाशिवनगर, काशिकोनगर, बेळे कॉलनी, भुजबळ फार्म परिसरासह शहरातील हजारो भाविक या उत्सवात सहभागी होवून गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

यंदा उत्सवाचे सोळावे वर्ष आहे. रविवारी दुपारी बारा वाजता श्रींचा जन्मोत्सव साजरा होवून आरती करून नैवेद्य दाखवला जाईल. दुपारी तीन वाजेपासून महिला भाविक श्री विजय ग्रंथ पारायण करतील. सायंकाळी सात वाजता महाआरती होईल, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

या सोहळ्यासाठी शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर; धवल खैरनार, संगिता देशमुख, भारती देशमुख, मंदाकिनी कौलगीकर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, संजय टकले, विनोद पोळ, निंबा अमृतकर, शिवाजी मेने, अशोक पाटील, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, मंदार सडेकर, दिलीप दिवाणे, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील, घनश्याम सोनवणे, गोविंद गांगुर्डे, अशोक चौधरी, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, आनंदा तिडके, मगन तलवार, दीपक दुट्टे, राहुल काळे, सचिन राणे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील, परेश येवले, राकेश पिंगळे, संकेत गायकवाड (देशमुख), सचिन जाधव, राहुल कदम, संग्राम देशमुख, संदीप गहिवाड, मनोज बागुल, मयुर ढोमणे आदी परिश्रम घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790