नाशिक (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंक ठिकाणी रुग्णांना आता उपचारांसाठी बेड मिळणेही फार अवघड झाले आहे असे चित्र दिसतंय . त्यामुळे या अवघड स्थितीत नाशिकमध्ये शासनाच्या वतीने कॉल सेंटर सुरु केले जाणार आहे. अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नाशिक केली.
टोपे म्हणाले कि. आरोग्य विभागातील कर्मचार्यांची भरती मेरिट पद्धतीने करण्यात येईल. सोबतच इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन वाढवणार, डेड ऑडिट कमिटीची स्थापना, अॅण्टीजेन टेस्ट वाढवणार आहेत. डॉक्टरच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आपल्या कामकाजात आयएमएला सहभागी करुन घेणार आहे. मालेगावमधील बर्या झालेल्या कोरोना रुग्णांचा प्लाझ्मा वापरुन नाशिकमध्ये प्लाझ्मा बँक सुरु करणार.
या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री याना सादर केला करणार आहे.. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेतील असेही टोपे यांनी स्पष्ट केले. मात्र जगातील लॉकडाऊन करण्याचा प्रघात पाहता, त्यानुसार नाशिक शहरात लगेचच लॉकडाऊन करायची गरज नाही, मात्र पुढे गरज पडल्यास लॉकडाऊनचा विचार होईल असेही टोपे यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, पालकमंत्री ना.छगन भुजबळ,आरोग्य मंत्री राजेश टोपे, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे बैठक घेतली गेली.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, मालेगावच्या महापौर ताहीरा शेख, माजी आमदार पंकज भुजबळ, जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,तसेच राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्याधिकारी लीना बनसोडनाशिक परिक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग डोर्जे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.