नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पेठ महामार्गावर अपघातांचा घाट म्हणून ओळखला जाणारा कौटुंबि घाटात आज पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झालाय. पश्चिम बंगाल होऊन तीर्थयात्रा करण्यासाठी येणारी स्लीपर कोच घाटामध्ये उलटल्याने 40 जण जखमी झाले आहेत.
संध्याकाळी झालेल्या या अपघातात चार जण गंभीर असल्याने या सर्वांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बहुतांशी ज्येष्ठ नागरिक असल्याने उपचारामध्ये अनेक अडचणी येत आहेत.
हा महामार्ग चौपदरीकरण होऊन सुद्धा घाटाचे मात्र चौपदरीकरण झालेले नाही. घाट तयार करताना तांत्रिक आधार न घेतल्याने या घाटामध्ये सातत्याने अपघात होत असतात. पेठ परिसरातील लोकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात अनेक वेळेस आंदोलने करूनही याकडे लक्ष न दिल्याने हा घाट मृत्यूचा सापळा ठरला आहे