नाशिक: महिलांनो सावधान; रिक्षा प्रवासात महिलेचे एक लाखाचे दागिने लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' महत्वाच्या वाहतूक मार्गात दोन दिवस (दि. ५ आणि ६ जून) महत्वाचे बदल…

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पूनम विक्रम जखवाडे (वय ४४, रा. श्री संकुल अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड) ही महिला दि. १८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता रिक्षाने प्रवास करीत होती.

ही महिला पेठ रोडवरील भक्तिधामजवळ असलेल्या मारुती मंदिराजवळ प्रवास करीत असताना तिच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा ऐवज रिक्षातील सहप्रवाशाने चोरून नेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्याच्या रस्ते कामांना गती द्या; विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790