नाशिक: भरधाव कार झाडावर आदळल्याने ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील राणा हॉटेल जवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने मुंबईच्या ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात मृत महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  TCS प्रकरण: फॉरेन फंडिंगचा संशय; एटीएस, ‘एनआयए’शी पत्रव्यवहार

सिमा सुधीर गर्गे (रा.नाहूरगाव, मुलूंड वेस्ट,मुंबई) असे मृत महिलेचे नाव असून, या अपघातात सुधीर गंगाधर गर्गे (६१) हे गंभीर जखमी झाले आहेत. गर्गे दांम्पत्य रविवारी (दि.१०) सकाळी आपल्या ते कारने नाशिककडून कळवणच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दिंडोरीरोडने प्रवास करीत असतांना राणा हॉटेल भागात भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

🔎 हे वाचलं का?:  गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

या अपघातात दांम्पत्य गंभीर जखमी झाले होते. दोघांना सिनर्जी हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी (दि.११) उपचार सुरू असतांना सिमा गर्गे यांना डॉ. भरत आहिरे यांनी मृत घोषित केले. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790