नाशिक: शिवपुराण कथेत दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड; मराठवाडा, राजस्थानातील टोळ्यांचे कृत्य

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरामध्ये गेल्या महिन्यात शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असता, भाविकांचे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोघींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. धारदार कटरच्या मदतीने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

२१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवस पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसांमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

परंतु याच काळात आलेल्या महिला भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत संधी साधली होती. शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी १८ भाविकांचे २१ तोळे सोने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले होते.

तर, पाच दिवसांमध्ये सुमारे ३६ पेक्षा अधिक भाविक महिलांचे सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; सतर्कतेचे आवाहन...

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित महिला या मराठवाडा व राजस्थानातील असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार, पथकाने संशयित महिलांचा माग काढत मराठवाड्यातील जालना, परभणी गाठले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलीसह महिलेला अटक केली. दोघींच्या चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

एक पथक राजस्थानात:
प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक राजस्थानात ठाण मांडून आहे. शिवमहापुराण कथा सोहळ्यात मराठवाड्यातील संशयित महिलांसह राजस्थानी पेहराव असलेल्या महिला व पुरुषांनी धारदार कटर व ब्लेडच्या सहाय्याने महिलांचे दागदागिने, पर्समधील किमती वस्तू चोरी केल्या आहेत. राजस्थानी टोळीला ताब्यात घेण्यासाठी नाशिक पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790