Live Updates: Operation Sindoor

नाशिक: अंबड परिसरात बिबट्याची दहशत; संध्याकाळनंतर रस्त्यांवर शुकशुकाट

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अंबड येथील श्रीरामनगर, फडोळ मळा या भागात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्या रस्त्याने जाताना दिसला. त्यानंतर तो पुढे मळे परिसरातून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मागील अनेक दिवसांपासून बिबट्या दिसण्याच्या घटनेपासून तर पकडण्यापर्यंत सर्व चर्चा सुरू असताना त्याची दहशत कायम असल्याचे समोर येत आहे.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

रात्री बिबट्या दिसल्याची चर्चा पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.‎ याच रस्त्याने रात्रीच्या वेळी अनेक कामगार ये‎- जा करतात त्यामुळे कुणावर हल्ला होऊ नये.‎ तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी असेही‎आवाहन करण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

याबाबत‎ नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती ‎कळविली असून पिंजरा लावण्याची मागणी‎ होत आहे. आठड्यापूर्वी सावतानगर,‎ गोविंदनगर भागात बिबट्याला पकडण्यात यश‎आले. बुधवारी रात्री पाथर्डी परिसरात बिबट्या‎ पकडण्यात आला. त्यामुळे अंबड भागातही ‎बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण पसरले‎आहे.‎

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

सध्यातरी बिबट्या नाही, तरी नागरिकांनी सतर्क रहावे‎. या भागातून नागरिकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याचे कळविले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी आमच्या पथकाने घटनास्थळी पहाणी केली आहे. सध्या तरी तिथे बिबट्या नाही. नागरिकांनी सतर्क रहावे. – अनिल अहिरराव, वन आधिकारी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790