नाशिक: सारडा सर्कल परिसरात बर्निंग कारचा थरार; ओमनी जळून खाक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील प्रचंड गर्दीच्या सारडा सर्कल येथे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ओमनी कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

या आगीमुळे द्वारकाकडे जाणारी व येणारी वाहने रस्त्यातच अडकल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या ओमनीमध्ये एक लहान बाळ आणि त्याची आई देखील होती.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

दरम्यान, या दोघांनाही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र, नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नसून आगीत ओमनी जळून खाक झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790