नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह पुण्यातून मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश शिवाजी दाभाडे (वय २३, रा. बळसाने, ता. साक्री, धुळे) व नीलेश पुंडलिक चव्हाण (वय २३, पत्राळ, ता. भडगाव, जळगाव) अशी या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ६० हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या.
नाशिक शहर व पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातून हे दोघे मोटारसायकलची चोरी करायचे. याविषयी पोलिस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखे (युनिट-२)चे पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलिस हवालदार राजेंद्र घुमरे, शंकर काळे, प्रशांत वालझाडे, अतुल पाटील, जितेंद्र वजिरे यांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता, पिंपरी चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरीच्या आठ घटना उघडकीस आल्या. यात मुंबई नाका परिसरातून युनिकॉर्न, सातपूर पोलिस ठाण्याच्या हदीतून बुलेट, महाळुंगे एमआयडीसीतून स्प्लेंडर, भोसरी परिसरातून होंडा शाईन, स्प्लेंडर, दिघी परिसरातून स्प्लेंडर प्लस मोटारसायकल ताब्यात घेतली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790