धुळे – मुंबई एक्सप्रेस सुरु, ‘असे’ आहे वेळापत्रक, ‘या’ स्टेशनवर थांबणार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): धुळे-दादर या दररोज धावणाऱ्या नवीन एक्स्प्रेसला सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र, मनमाडहून तीन दिवस सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस आता धुळे-दादर एक्स्प्रेस म्हणून रोजच धुळ्याहून सुटणार असल्याने गोदावरीने अप-डाऊन करणारे चाकरमाने, नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली.

या नवीन गाडीला खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे रेल्वे स्थानकातून सकाळी साडेसहा वाजता हिरवा झेंडा दाखविला. धुळ्याच्या महापौर प्रतिभा चौधरी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. मध्य रेल्वेने पुणे-नाशिक-भुसावळ ही थेट पुण्याला जाणारी गाडी दौंड-मनमाडमार्गे अमरावतीला नेण्यास सुरुवात केल्याने नाशिककरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केला. आता धुळे-मुंबई गाडी सुरू करून दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

असे आहे वेळापत्रक:
दादर-धुळे दैनिक एक्स्प्रेस (११०११) ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी बारा वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचेल. धुळे-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (११०१२) ही गाडी धुळ्याहून दररोज सकाळी साडेसहा वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी दुपारी १४.१५ वाजता पोहोचेल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

या स्थानकांत थांबणार:
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड या रेल्वे स्थानकांत या गाडीला थांबा असेल. या गाडीला १६ डबे असून, त्यात एक वातानुकूलित चेअर कार, १३ नॉनएसी चेअर कार (पाच आरक्षित आणि आठ अनारक्षित), तर एक जनरल सेकंड क्लासच्या डब्याचा समावेश आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here