नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून अडवून धरलेला ट्रक सोडण्यासाठी ३५ हजारांची लाच खासगी व्यक्तीकडून स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदारासह खासगी व्यक्तीची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ७) अटक करून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
रवींद्र बाळासाहेब मल्ले (वय ३९, रा. नाशिक) असे नाशिक तालुका पोलिस ठाण्यांतर्गत विल्होळी पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव असून, तरुण मोहन तोडी (रा. नाशिक) याच्या मध्यस्थीतून लाच स्वीकारली होती.
या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ८) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे.