नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीत घरफोडी, चोरीचे गुन्हे रोखण्याकरिता पोलिस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मधील नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, अंबड, इंदिरानगर, सातपूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कोम्बिंग ऑपरशन मोहिम राबवत १३५ गुन्हेगारांना चेक करण्यात आले. ६५ गुन्हेगारांकडून चौकशी फार्म भरुन घेण्यात आले.

उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील ६ पोलिस ठाण्यात कोंबिम ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत घरफोडी, चोरी, लुटमार, वाहनचोरी आणि अन्य चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची घरांची झडती घेण्यात आली. ६५ गुन्हेगार घरी मिळून आले त्यांच्याकडून चौकशी फार्म भरण्यात आले. १२ जणांना समन्स वॉरंट बजावण्यात आले.
असे आहे नियोजन: परिमंडळ २ मधील ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिक्स पॉइंट, पायी, दुचाकी गस्त आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरु करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पद फिरत असल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन उपआयुक्त राऊत यांनी केले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790