नाशिक: आज (दि. ९) शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा नाही; उद्याही कमी दाबाने पुरवठा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जमिनीची लेव्हल करताना जेसीबीचा फटका पाइपलाइनला बसल्याने शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या १३०० मिलिमीटर व्यासाच्या गंगापूर धरण थेट जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे.

यामुळे सातपूर व पश्चिम भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

गंगापूर धरणावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पंपिंग स्टेशन उभारले जात आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होऊन थेट जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो.

बुधवारी सकाळी जलशुद्धीकरण केंद्रापासून काही अंतरावर थेट जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली. जवळच्या परिसरात खासगी जागा लेव्हल करताना जेसीबीचा फटका बसल्याने जलवाहिनी फुटली. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

यामुळे सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८, ९, १०, ११, तसेच पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ व १२ या प्रभागांमधील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी दहापासून या प्रभागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. गुरुवारी (ता. ९) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. १०) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

या भागात पाणीपुरवठा राहणार बंद:
सातपूर विभाग: प्रभाग क्रमांक ८ मधील बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाइपलाइन रोड, काळेनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, काळेनगर, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर. प्रभाग क्रमांक ९ मधील ध्रुवनगर जल कुंभ परिसर, ध्रुवनगर, मोतीवाला कॉलेज परिसर, हनुमाननगर, संभाजीनगर, शिवशक्ती कॉलनी, प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर, प्रभाग ११ मधील प्रबुद्धनगर.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ मधील नहुष जलकुंभ, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंदनगर, डी. के. नगर, शांतिनिकेतन सोसायटी परिसर, आयचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर. रामराज्य जलकुंभ- सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल परिसर, जहान सर्कल परिसर, डिसूझा कॉलनी, शिवगीरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एस. टी. कॉलनी परिसर, शहीद चौक परीसर. प्रभाग १२ मधील यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसूझा कॉलनी, कॉलज रोड व इतर परिसर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790