नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गरवारे चौफुलीसमोर असलेला उड्डाणपुलाचा रस्ता ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत ३३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
गोरख कडूबा जाधव (३३, रा. कौतेकरवाडी, पाथर्डी शिवार), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गोरख जाधव हे पाथर्डी सर्व्हिस रोडवरील एका खासगी वॉशिंग सेंटरमध्ये काम करतात. घरी जात असताना गरवारे चौफुली येथून पांडव लेण्यांच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारने (डीएन-०९- क्यू- 7157) त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत जाधव हे वीस ते पंचवीस फूट लांब अंतरावर घसरत गेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कारचालक ओंकार राजेंद्र कानडे (२४, रा. गोविंदनगर, सिडको) याला अंबड एमआयडीसी चौकीच्या पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
![]()


