अखंड वीज पुरवठ्यासाठी योजनांची योग्य अंमलबजावणी करा: विश्वास पाठक यांचे निर्देश

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ग्रामीण, शहर, उदयॊग व शेती यांना कायमस्वरूपी व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्य सरकारने वीज निर्मिती, पारेषण तथा वितरण याचे जाळे मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS) या सारख्या अनेक महत्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. भविष्यात राज्याला तसेच जिल्ह्याला लागणाऱ्या विजेसाठी या योजनांचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी दिले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

नाशिक जिल्हाअंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालयाच्या सभागृहात आज (०१ नोव्हेंबर) सकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर उपस्थित होते.

नाशिक जिल्यातील वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या ऊर्जा क्षेत्राबद्दल असलेल्या सूचना, समस्या व तक्रारी गांभीर्याने समजून घेऊन त्या प्राधान्याने निर्धारित मानकाप्रमाणे सोडविण्यात याव्या. ग्रामीण तथा शहरी भागातील वितरण रोहित्र बिघाडानंतर कृती व मानकाप्रमाणे वेळेत बदलण्याची कार्यवाही करावी. विद्युत अपघातामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागतात ही दुर्दैवाची बाब असून विद्युत अपघात शून्य होण्यासाठी विद्युत निरीक्षक विभाग यांनी शाळा तथा ग्राहकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत, असेही निर्देश मा. विश्वास पाठक यांनी दिले.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत असून मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यात येत असून अखंडित वीज पुरवठा करण्यात येत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ऊर्जा विभागाने सेवेचा दर्जा आणखी वाढवून संवाद साधण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जा क्षेत्रात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती अनेक मानकामध्ये आघाडीवर असून अशाच प्रकारे आणखी जोमाने व गतीने कार्यरत राहावे. त्यांच्या अडचणींचे निवारण करण्याकरिता शासन पाठीशी असल्याचे विश्वास पाठक म्हणाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या नाशिक आणि मालेगाव मंडलातील महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाययोजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि प्रस्तावित नियोजन यासंदर्भात नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी तथा वीजनिर्मिती संदर्भात महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे आणि महापारेषणच्या संदर्भात मुख्य अभियंता संजीव भोळे यांनी सविस्तर सादरीकरण बैठकीमध्ये केले.

बैठकीला महावितरण, महापारेषण, महानिर्मिती महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते यावेळी बैठकीला उपस्थित होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here