नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून दोन महिलांना साडेपाच लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन काम शोधणे या महिलांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आडगाव शिवारात राहणारी महिला गेल्या सप्टेंबर महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना तिच्याशी एका व्हॉटसअप क्रमांकावरून व वेगवेगळया टेलिग्राम सोशल साईडवरून संपर्क साधण्यात आला होता. घरबसल्या पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळे टास्क देण्यात आले.
यापोटी तिला अवघ्या चार ते पाच दिवसात टेलीग्राम आयडी तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सीस बँक खात्यात ३ लाख १५ हजाराची रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले.
तर दुस-या महिलेस वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. इस्टाग्राम या सोशल साईडच्या प्लॅटफार्म जाहिरातीसाठी त्यांना ऑनलाईन पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखविण्यात आले. ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान त्यांना टास्कची ऑर्डर पूर्ण करण्याकरीता टेलीग्राम व युपीआय आयडी तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी व अॅक्सीस बँकेच्या वेगवेगळया खात्यात २ लाख १५ हजार ११६ रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले. महिना उलटूनही मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही महिलांनी सायबर पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790