मुंबई (प्रतिनिधी): ललित पाटील याला अंधेरी लॉकअपमधून अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आलं. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी सुनावणी सुरू झाली. नाशिक ड्रग्ज प्रकरणात साकीनाका पोलिसांनी चार आरोपींना आज अंधेरी कोर्टात हजर केले होते. या प्रकरणी ललित पाटीलला 27 ऑक्टोबर पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात ललित पाटील यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून त्याच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ भूषण पाटील सोबत ड्रग्जचा कारखाना चालवत होता. ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साथीदार ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली होती.
ललित पाटील यांच्या सांगण्यावरून सचिन वाघ याने ड्रग्ज लपवले आहेत किंवा त्याची विल्हेवाट लावली आहे का याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी कोठडी वाढवून मिळावी अशी पोलिसांनी मागणी केली. याप्रकरणात मोठं रॅकेट काम करत आहे, यामध्ये आणखी आरोपीचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं. त्याच बरोबर भूषण पाटील, सचिन वाघ, ललित पाटील यांची समोरा समोर चोकशी करणे गरजचे आहे, त्यासाठी कोठडी वाढ करून द्यावी अशी मागणी करण्यात आली.
ललित पाटीलचे वकील स्वप्नील वाघ यांनी न्यायालयाला सांगितलं की, ललित हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. या प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. ललित वाघ याची याआधी सहा दिवस कसून चौकशी केली आहे. त्यामुळे ललितला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी.
त्यावर सरकारी वकील बागवे म्हणाले की, ललित जरी प्रत्यक्ष सहभग नसला तरी लालितच्या सांगण्यावरून हे सर्व चालू होतं. ससून रुग्णालयात असताना हा 2 किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची नोंद आहे. यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग आढलून आला आहे.
यावर न्यायाधीश विजय गवई यांनी ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. यामध्ये कारखान्याचं अग्रिमेट कोणाच्या नावाने केलं आहे. त्याला आरोपी करण्यात आले आहे का? त्या कारखान्याची मालकी कोणाकडे आहे? असे न्यायाधीशांनी सवाल विचारले आहेत.
त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, एमआयडीसी आणि कांबळे या व्यक्तीच्या नावे ही जागा लिज वर घेतली आहे. कांबळे या व्यक्तीने यादव या व्यक्तीला कारखाना चालवायला दिला होता. भूषण पाटील हा यादव यांना गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून भाड्याची रक्कम देत होता.