नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सिटी लिंकने आता पासधारकांसाठी सर्वसाधारण पासकार्डऐवजी आरएफआयडी कार्ड ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे अनेक नोंदी, ट्रॅकिंग, फ्रिक्वेन्सी याची सुविधा प्रवाशांना मिळणार असल्याचे सिटी लिंकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२५ ऑक्टोबर हे कार्ड सिटी लिंक मुख्यालय येथील पास केंद्र येथून दिव्यांग व्यक्तींना कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. हे कार्ड वितरीत करण्यात आले तरी सदर कार्डचा मात्र १ जानेवारी २०२४ पासूनच वापर करता येणार आहे.
या कार्डकरिता पासधारकांकडून ८५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षाकरिता ज्या पासधारकांनी पास काढले आहेत. त्यांना पास नूतनीकरणावेळी आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. यापूर्वीच पास काढलेल्या प्रवाशांकडून पास काढतेवेळी ५० रुपये शुल्क आकरण्यात आलेले होते. त्यामुळे अशा पासधारकांकडून या कार्डकरिता केवळ ३५ इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
आयडेंटिफिकेशन म्हणजेच हे कार्ड असणार आहे. हे कार्ड स्वयंचलित ओळख आणि डेटा कॅप्चरची एक पद्धत आहे. रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन ऑब्जेक्ट्सशी जोडलेले टॅग स्वयंचलितपणे ओळखण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड वापरते. पासधारकांना हे कार्ड दिल्यास वाहकांच्या मशिनमध्ये नोंद होणे सोयीचे होईल.हे कार्ड स्कॅन केल्यामुळे बसमधील प्रवासी संख्या किती आहे हे वाहकास लगेच अवगत होणार आहे.