Live Updates: Operation Sindoor

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या

मुंबई (प्रतिनिधी): पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ललित पाटीलला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी जंग – जंग पछाडून ललित पाटील 15 दिवसानंतर अखेर हाती लागला आहे. आपल्या ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील कर्नाटक येथे लपला होता. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पोलिसांच्या नाकाखालून पळून गेला होता.  पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलिस देखील त्याच्या मागावर होते. मुंबई पोलिसांच्या टीम ललिल पाटीलच्या मागावर होत्या.

आज मुंबईला आणण्याची शक्यता:
ललित पाटील 2 ऑक्टोबरल रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी हे कारवाई केली होते. साकीनाका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होते. ललित पाटील पुण्यातून, गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला. कर्नाटकातून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती माहिती मिळाली.  ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं?:
साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात  ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे. त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.

कसा केला पुणे ते चेन्नई प्रवास?:
एकीकडे फरार ललित पाटीलवरून राज्यात वातावरण तापले होते. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी एका बडा नेत्याचा हात असल्याचे आरोप होत होते. सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होते. या दरम्यान ललित पाटील मात्र  एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि आणि त्याचे दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहचला. या  सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर  एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक:
स्थानिक पातळीवर पोलीस आणि डॉक्टरांचे घट्ट जाळं ललित पाटीलने स्वतःच्या बचावासाठी विणलं होतं. तसच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा तो भाग होता. त्यातूनच मलेशिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये त्यानं मेफेड्रोन पाठवल्याच समोर आले होते. हे ड्रग सिंडिकेट तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतच आहे शिवाय तो कधी सापडूच नये असे वाटत होते. ललित पाटीलला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न होत असताना साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक होत आहे 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790