नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली असून कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे सुरु असलेल्या चार कॉफी शॉप उध्वस्त करण्यात आले आहेत. या शॉप्समधून जवळपास 40 हुन अधिक निरोधचे पाकिटे, विविध कॅडबरीज आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. कॉफी शॉप्समध्ये सोफे, बेडचीही व्यवस्था करण्यात येऊन दर तासाला 300 रुपये आकारले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याच्या संशयावरून सिन्नर शहरातील आठवण कॅफे, रिलॅक्स कॅफे, व्हॉटसअप कॅफे आणि हार्टबीट कॅफे या शॉप्सवर छापे टाकण्यात आले. यावेळी या शॉप्समध्ये काही अल्पवयीन मुलींसोबत मुलांचे अश्लील चाळे सुरू असल्याचं समोर आलं.
या शॉप्समधून जवळपास 40 हुन अधिक निरोधचे पाकिटे, विविध कॅडबरीज आणि ईतर साहित्य हस्तगत करण्यात आले. कॉफी शॉप्समध्ये सोफे, बेडचीही व्यवस्था करण्यात येऊन दर तासाला 300 रुपये आकारले जात होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने कॅफेमधील साहित्य उध्वस्त करत कॅफेचालकांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शहरातील भरवस्तीत खुलेआम हे प्रकार सुरू असतांना स्थानिक सिन्नर पोलीस याबाबत अनभिज्ञ कसे होते? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यातील कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्याबरोबरच अत्याचार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
कॉफी शॉप चालकांची धांदल… :
दरम्यान सिन्नर शहरातील भरवस्तीत सुरु असलेल्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकताच कॉफी शॉप चालकांची चांगली धांदल उडाली. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. यावेळी कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुले-मुलीही आढळून आले.
सदर कॉफी शॉपमध्ये छोटे-छोटे कंपार्टमेंट करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी सोफ्याची व बेडचीही व्यवस्था करण्यात आली होती. अंधारमय असणाऱ्या या कंपार्टमेंटमध्ये मुले व मुली अश्लील चाळे करत असल्याचे या प्रकारातून दिसून आले.
कॉफी शॉप केवळ नाव असून या शॉपमध्ये कॉफी किंवा चहाचा प्रकार कुठलाही प्रकार दिसून आला नाही. या कंपार्टमेंटमध्ये बसण्याचे तासाला 200 ते 300 रुपये चार्ज लावण्यात येत असल्याची माहिती यावेळी उघडकीस आली. कॉफी शॉपची झडती घेतली असता या ठिकाणी चक्क 40 हुन अधिक वापरलेले निरोध सर्वत्र पडल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य उध्वस्त केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.