नाशिक: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वाहतूकीत महत्वाचे बदल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील जुना आग्रारोड येथे कालिका मंदीरांचे परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरते. त्यामुळे १६ ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत कालिकादेवी मंदीराचे परिसरात वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूकी संबधीची अधिसूचना पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली आहे.

वाहतूकीस प्रवेश बंद मार्ग:
१) गडकरी सिग्नल ते हॉटेल रूची पर्यंतचा मार्गावर सर्व प्रकारच्या जाण्या-या व येण्या-या वाहनांना वाहतूकीसाठी प्रवेश बंद राहील.

२) चांडक सर्कल ते हॉटेल संदिप पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या येण्या-या व जाण्या-या वाहनांना वाहतूकीसाठी प्रवेश बंद राहील.

वरील मार्गावरुन जाणा-या व येणा-या सर्व प्रकारची मोटार वाहने, हातगाडया, बैलगाडया, सायकल व इतर सर्व प्रकारची मोटार वाहने यांना वाहतूकीसाठी नवरात्रौत्सव दरम्यान १५ ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत वरील मार्गावर वाहतूकीसाठी पूर्णवेळ प्रवेश बंद राहील.

वाहतूकीस हे असतील पर्यायी मार्ग:

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

नवरात्रोत्सव दरम्यान १७ ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत वाहतूक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

१) भवानी सर्कल ते मुंबईनाक्याकडे जाणारी वाहतूक भदानी सर्कल सिबल फर्निचर नासर्डी (नंदिनी) नदी पुल -आर. डी. सर्कल- इंदिरानगर जॉगींग ट्रॅक मार्गे मुंबईनाका व इतरत्र जातील.

२) चांडक सर्कल ते सीबीएस, शालीमार, सारडा सर्कल व व्दारका कडे जाणारी वाहतूक चांडक सर्कल ते गडकरी सिग्नल मार्गे इतरत्र जातील.

३) व्दारका सर्कल कडुन शहरात येणारी वाहतूक व्दारका सर्कल सारडा सर्कल शालीमार मार्गे येतील व जातील

४) सर्व एस. टी. बसेस, सिटीलीक बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही मोडकचौक सिग्नलवरुन खडकाळी सिग्नल मार्गे ६० फुटी रोडने व्दारकासर्कल या मार्गाने नाशिकरोड, सिडकोकडे, इतरत्र जातील व त्याच मार्गाने येतील

५) मुंबई नाक्याहून शहरात येणारी हलकी वाहने ही महामार्ग बसस्थानक टॅक्सी स्टॅन्ड, तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरुम समोरुन चांडकसर्कल भवानीसर्कल या मार्गाने अंबकरोडने शहरात येतील.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

६) तसेच नाशिक शहरातुन अंबड, सातपुर परिसरात जाणारे जड वाहने ही व्दारकासर्कल वरून गरवारे टी पॉइन्ट यामार्गाने सातपुर एम. आय. डी. सी. मध्ये जातील.

७) तसेच व्दारकसर्कल वरुन पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवारपुल, संतोष टी पॉईन्ट, रासबिहारी हायस्कुल या मार्गाने पंचवटीत जातील.

८) तसेच सारडा सर्कल कडुन गडकरी चौकाकडे येणारी वाहने ही एन. डी. पटेल रोड किटकॅट चौफुली या मार्गाने मोडक सिग्नल मार्गे जातील.

नाशिकरोड विभागात हे आहे बदल:
नाशिक रोड विभागामधील भगुर येथील रेणुकादेवी मंदीर, रेस्टकॅम्प रोड येथे नवरात्र उत्सवा निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

या मार्गावर या वाहनांना बंदी:
रेस्ट कॅम्परोड हा चिंतामणी चौफुली ते नाका नं २ भगुर पर्यंत, या मार्गावर सर्व प्रकारची स्वयंचलीत वाहने, हातगाडया, बैलगाडया, सायकल व इतर सर्व प्रकारची मोटार वाहने यांना वाहतूकीसाठी दुपारी १४.०० ते २४.०० वा. पर्यंत नवरात्रौत्सव कालावधीत प्रत्येक दिवशी ‘बंद’ राहील.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

हे आहे पर्यायी मार्ग:

नवरात्रौत्सव कालावधीत प्रत्येक दिवशी व नमुद वेळेत भगुर गावाकडुन देवळालीकॅम्प कडे व देवळाली कॅम्प कडुन भगुर गावाकडे जाणा-या एस.टी. बसेस, रिक्षा व इतर सर्व प्रकारचे स्वयंचलीत वाहने ही रेस्ट कॅम्प रोडवरील वाहतुकीसाठी जोशी हॉस्पीटल – स्नेह नगर पेरूमल मार्ग टॅम्पल हील रोड जोझीला मार्ग रेस्ट कॅम्प – रोडवरील सेंट्रल स्कुल या मार्गाचा वापर करुन नागरीक इच्छीत स्थळी जातील व येतील.

सदर मार्ग वापरण्याकरीता कमांडंट ऑफिसर स्टेशन हेडक्वॉरटर देवळाली कॉम्प यांनी लेखी परवानगी दिलेली आहे. हे सर्व निर्बंध नवरात्रौत्सव १५ ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत प्रत्येक दिवशी १४.०० ते २४.०० वा. पावेतो अंमलात राहतील. तसेच, वरील मार्गात व वेळेत परिस्थीतीनुसार ऐनवेळी कोणतीही पुर्वसुचना न देता बदल करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात आलेले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here