नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका भागातील समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरटीओच्या पथकाने अडवल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि मागून धरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आतच बस उभ्या ट्रकवर जाऊन धडकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. मात्र, जांबरगाव टोलनाक्याच्या जवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला आणि ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आता धरधाव वेगाने येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.